गजानन नगरात ४० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; परिसरात खळबळ…

तरुण शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शहरातील गजानन नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामेश्वर मधुकर खरात (वय ४०) या व्यक्तीने निंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.

ही घटना नॅजरीन चर्चच्या मागील भागात दुपारी १ वाजताच्या सुमारास समोर आली. मृतदेह झाडाला लटकलेला दिसताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली.प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या रात्रीच्या वेळेस घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!