अज्ञात जळक्याचा कहर; अमोना शिवारात शेतकऱ्याची मक्याची सुडी जळून खाक…!

अमोना (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले मधुकर नामदेव वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी (सुडी) जळक्यानि पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या शेताचे नुकसान केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्याा अमोना शिवारातील गट नंबर ४२ व ४३ मध्ये ही घटना घडली. शेतकरी  वाघ यांनी आपल्या १५ एकर शेतातील मक्याचे पीक काढून मजुरांच्या साहाय्याने त्याची सुडी लावून ठेवली होती. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी या सुडीला आग लावून ती पेटवून दिली. शेतात गेल्यानंतर हा प्रकार शेतकऱ्याच्या निदर्शनास आला.

या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सोनकांबळे  आणि  जाधव आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

याप्रकरणी शेतकरी मधुकरराव वाघ यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२६ (फ) (शेतमालाचे आगीने नुकसान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!