खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :
तोरणा नदीत मासेमारीसाठी टाकलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी कंचनपूर शिवारात घडली.

जाहिरात…
मृताचे नाव गुलाब चंद्रभान घटे (२७, रा. बोथाकाजी, ता. खामगाव) असे आहे. तो आपल्या गावातीलच शेख रशीद शेख शफिक व शेख समीर शेख कालू या दोघांसोबत मासे पकडण्यासाठी गेला होता. यावेळी शेख रशीद व शेख समीर यांनी पाण्यात मासे मारण्यासाठी इलेक्ट्रिक वायर सोडला. त्या वायरचा शॉक बसल्याने गुलाब घटे जागीच मृत झाला.
या घटनेबाबत मृतकाचा भाऊ गोपाल घटे यांनी हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी शेख रशीद शेख शफिक व शेख समीर शेख कालू या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोहेकॉ साखरे हे चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.