विजेच्या प्रवाहाचा शॉक लागून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू !

नवऱ्याच्या माघारी दिरासोबत केले खोटे लग्न; मी तुला मारून टाकू का? असे म्हणताच दिराने....

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – विजेच्या प्रवाहाचा शॉक लागून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंढेरा येथे घडली. ही घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान घडली. मृत मुलीचे नाव दिव्या विनोद तेजनकर (वय ४) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या आपल्या लहान भावासोबत घरात खेळत होती. यावेळी सुरू असलेल्या कुलरला अचानक वीजेचा प्रवाह आला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरातील भिंती ओलसर झाल्या होत्या. भिंतीवरच्या विद्युत मीटरमधून आलेला प्रवाह ओलसर भिंतीत पसरल्याने हा अपघात झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

घटनेच्या वेळी दिव्याचे वडील विनोद तेजनकर शेतात कामासाठी गेले होते, तर आई घरकामात व्यस्त होती. अचानक झालेल्या या प्रकारात दिव्याचा मृत्यू झाला; मात्र तिच्यासोबत खेळत असलेला लहान भाऊ बचावला.

विनोद तेजनकर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!