बोलेरोची दुचाकीला धडक; एकजण ठार!

माजी सैनिकांचे उन्हाळी अधिवेशन २५ मे रोजी सिंदखेडराजा येथे; माँ जिजाऊ सृष्टीवर महाराष्ट्रभरातील माजी सैनिकांची उपस्थिती अपेक्षित!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) भरधाव बोलेरोने उभ्या दुचाकीला घडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना नांदुरा-जळगाव जामोद रोडवरील येरळी गावाजवळील नवीन पुलाजवळ २५ सप्टेंबरच्या संध्याकाळी घडली. याबाबत रात्री उशिरा बोलेरो चालकाद्धि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदुरा खुर्द येथील मो. अज्जमखान चांदखान व त्यांचा भाऊ जाहेदखान चांदखान हे दोघे जण दुचाकी क्रमांक एमएच २८-४२५ ने जळगाव जामोद येथून नांदुऱ्याकडे येत होते. दरम्यान, हे दोघेही दुचाकीस्वार येरळी येथे दुचाकी बाजूला उभी करून थांबले होते. जळगाव जामोदकडे जाणारी भरधाव बोलेरो एमएच ३० बीडी ३१८८ क्रमांकाच्या चालकाने ताब्यातील बोलेरो भरधाव व निष्काळजीपणाने चालवून उभ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये जाहेदखान चांदखान यांचा मृत्यू झाला. अशी तक्रार मृताचा भाऊ मो. अज्जमखान यांनी पोलिसांत दिली. त्यामुळे पोलिसांनी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ भारसाकळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!