दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दोघांना अमडापूर पोलिसांची अटक…

अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पहिली घटना ही मंगरूळ नवघरे बसस्टँड येथे घडली. गणेश मुरलीधर प्रकाळ (रा. मंगरूळ नवघरे) हा दारू पिऊन गोंधळ घालताना आढळला.

दुसरी घटना वरखेड बसस्टँड येथे घडली. गणेश सिताराम कणखर (रा. वरखेड) हा देखील नशेत धिंगाणा घालताना पोलिसांच्या ताब्यात आला.

दोन्ही प्रकरणांत एएसआय दिलीप तोंडे (बन क्र. ३१८) यांच्या फिर्यादीवरून कलम ८५(१), महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.

“सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनी धडा घ्यावा,” असे पोलिस प्रशासनाचे आवाहन.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!