बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात फटाके फोडण्याच्या कारणावरुन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. या भांडणात शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तसेच नातेवाईकाचा मोबाईल सुद्धा गहाळ झाल्याचे तक्रारकर्त्याने म्हटले आहे.
स्थानिक विकास मुकुंदा शिवदे वय ४५ वर्ष रा. धांडे ले आऊट बुलढाणा यांनी केलेल्या तक्रारी नुसार त्यांच्या घराचे शेजारी मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८. ३० वाजे सुमारास घरी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर घराशेजारचे हे फटाके फोडताना फटाके आजूबाजूला फेकत होते. सदर फटाके हे बाजूच्या रेतीच्या गंजावर फेकत असल्याने रेती त्यांच्या अंगावर उडत होती म्हणून त्यांनी फटाके फोडणाऱ्यास रेतीवर फटाके फेकू नका ती रेती आमच्या अंगावर उडत आहे असे म्हटले असता फटाके फोडणाऱ्याने तू घरात जा नाहीतर तुला घरात येऊन मारेल असे म्हणून मादरचोद, हरामखोर अशी अश्लील शिवीगाळ केली. यावेळी
तक्रारदार हे शिव्या देऊ नको असे समजून सांगण्यासाठी गेले असता त्यांनी तक्रारदारास चापटा बुक्क्यांनी, काठीने मारहाण केली तेव्हा त्यांची पुतणी ही भांडण सोडविण्यास आली असता सदर भांडणामध्ये त्यांच्या पुतणीचा विवो कंपनीचा मोबाईलगहाळ झाला आहे. सदर व्यक्तीने जिवाने मारण्याची धमकी दिली आहे तसेच त्यांच्या पासून माझ्या परिवाराच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे असे तक्रारदाराने म्हटले आहे. मापोनिसा यांच्या आदेशान्वये पुढीलतपास पोहेकॉ दत्तात्रय नागरे शहर पोलीस हे करीत आहे











