१५ वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू; अंढेरा गावाजवळील घटना

पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

अंढेरा (नंदकिशोर देशमुख: बुलडाणा कव्हरेज न्युज) – बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा गावाशेजारील डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना १५ जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली.

प्रणव केशठ इंगळे (वय १५, रा. अंढेरा) असे मृत मुलाचे नाव आहे. प्रणव यावर्षी १०वी इयत्तेत शिक्षण घेत होता. घरात चार-पाच बकऱ्या असल्यामुळे तो आई-वडिलांना मदतीसाठी बकऱ्या चारायला जात असे. १५ जुलै रोजी त्याचे आई-वडील शेतात काम करत असताना प्रणव बकऱ्या चारण्यासाठी एकटाच गेला होता.

सायंकाळी बकऱ्या घरी परत आल्या, मात्र प्रणव घरी आला नाही. त्यामुळे घरच्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना गावालगत नंदू सानप यांच्या शेताजवळील डोहाशेजारी प्रणवची कुन्हाड आढळून आली. त्यानंतर गावकऱ्यांनी लोखंडी गळाच्या सहाय्याने डोहात शोध घेतला असता प्रणवचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, पीएसआय गजानन वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार, प्रणव बकऱ्या चारताना शौचासाठी थांबला असताना पाणी घेताना पाय घसरून तो डोहात पडला. त्याला पोहता न येत असल्यामुळे तो बुडाला. त्या वेळी आजूबाजूला कुणीही नसल्यामुळे त्याला वाचवता आले नाही.

या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृतदेह देऊळ महाल येथील रुग्णालयात पाठविण्यात आला.प्रणव हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!