चिखली, देऊळगाव राजा नंतर आता या डॉक्टरचा लागला नंबर…; खंडणी द्या नाहीतर व्हिडीओ वायरल करू, महिला व कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा!

चिखली, देऊळगाव राजा नंतर आता या डॉक्टरचा लागला नंबर...; खंडणी द्या नाहीतर व्हिडीओ वायरल करू, महिला व कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा!

छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): रुग्णाला चालता येत नसल्याचे कारण सांगून एका बीईएमएस डॉक्टरला घरी बोलावून त्याच्यावर खोटे लैंगिक आरोप ठेवत ८६ हजार रुपये खंडणी उकळण्याची धक्कादायक घटना हर्सूलमधील चेतनानगर भागात घडली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात एका महिला आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २८ मे २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता घडली.

काय आहे प्रकरण?

खुलताबाद तालुक्यातील लोणी बोडखा येथील ५० वर्षीय बीईएमएस डॉक्टर आपल्या दवाखान्यात काम करत असताना त्यांना शकुंतला सांडू लहाने या महिलेचा फोन आला. तिने “माझ्या रुग्णाला चालता येत नाही, कृपया घरी या,” असे सांगितले आणि येण्याजाण्याचा खर्च देण्याचेही आश्वासन दिले. डॉक्टर आपल्या एका महिला सहकाऱ्यासह दुचाकीवरून हर्मूल येथील चेतनानगर भागात पोहोचले. मात्र, घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्याला बाहेर झाडाखाली थांबण्यास सांगितले. घरात गेल्यावर शकुंतलाने “रुग्ण बेडरूममध्ये आहे” असे सांगितले आणि डॉक्टर आत गेल्यावर दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला.

डॉक्टरचे अपहरण; तीन लाखांची खंडणी उकळून डॉक्टरांचा थरारक पलायन प्रवास…

सापळा आणि धमकी

बेडरूममध्ये शकुंतला लहाने पलंगावर बसली होती. तिने डॉक्टरांना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कपड्यांची फाडाफाड केली. डॉक्टरांनी याला विरोध केल्यावर तिने आपल्या पतीला बोलावले. पतीने दरवाजा उघडताच मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले. त्यानंतर त्यांचा मुलगा स्वप्निल लहाने, मुलगी, जावई गणेश आणि एक महिला नातेवाईक तिथे आले. त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

“हा व्हिडीओ व्हायरल होऊ द्यायचा नसेल तर ५ लाख रुपये द्या,” अशी धमकी देत त्यांनी डॉक्टरकडून ७८ हजार रुपये रोख आणि ८ हजार रुपये फोन पे द्वारे घेतले. एकूण ८६ हजार रुपये उकळल्यानंतर उर्वरित रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.

चिखलीतील डॉक्टर पेक्षा घाण व्हिडिओ सोशल मीडियावर? व्हायरल व्हिडिओमुळे देऊळगाव राजामध्ये खळबळ

गुन्हा दाखल?

हर्सूल पोलिसांनी २९ मे २०२५ रोजी शकुंतला सांडू लहाने, तिचा पती सांडू लहाने, मुलगा स्वप्निल लहाने, जावई गणेश आणि एका महिला नातेवाईक (सर्व रा. चेतनानगर, हर्मूल) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक बिरारी करत आहेत.

उपस्थित होणारा प्रश्न

या घटनेत एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे की, डॉक्टरने आपल्या महिला सहकाऱ्याला घरात सोबत नेण्याऐवजी बाहेर थांबण्यास का सांगितले? जर ती सहकारी सोबत असती, तर कदाचित खोटे आरोप लावणे कठीण गेले असते. हा मुद्दा तपासात महत्त्वाचा ठरू शकतो.

Shegaon News: तुला चांगली नोकरी लावून देतो,मग तिला लॉज वर बोलवत होता; लग्नाचं आमिष दाखवून तिच्या सोबत…

हर्सूल पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिसांना याप्रकरणी आणखी काही महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “चिखली, देऊळगाव राजा नंतर आता या डॉक्टरचा लागला नंबर…; खंडणी द्या नाहीतर व्हिडीओ वायरल करू, महिला व कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!