*EXCLUSIVE पांढरदेव ढगफुटीनंतर क्रांतिकारीत ‘गटबाजी’ची चर्चा? विश्वासू नेत्यांना डावलून नवे नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न?

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) —चिखली तालुक्यातील पांढरदेवसह अनेक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी ढगफुटी झाली. या घटनेनंतर तात्काळ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी तात्काळ त्यांनी तहसीलदार आणि कृषी तालुका अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली.तेव्हाच प्रशासनाने तलाठी व कृषी सहायक यांना याबाबत पाहणी करण्याचे सांगून प्राथमीक अहवाल मागविण्यात आला होता.

या घटनेची बातमी प्रसारमाध्यमांनमधे झळकूनही गेली. तरीही, त्यानंतर त्या ठिकाणी क्रांतीकारी संघटनेचे विश्वासू सहकाऱ्यांना विश्वासात न घेता, अन्य कार्यकर्त्यांनी पाहणीसाठी गेले आणि त्या बातम्या सुद्धा बुलढाणा हेल्पलाईन सेंटर येथून प्रसिद्ध करण्यात आल्याने जुन्या सहकाऱ्यांचा तुपकरांना विसर पडल्याची चर्चा चिखलीत सुरु झाली असून “तुपकर यांच्याकडून नवे नेतृत्व तयार केले जात आहे का?”असा प्रश्न उपस्थित होत असला तरी जुन्या सहकाऱ्यांचे चळवळीतील योगदानाचा विसर तुपकरांना पडला का?असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे

हुमणी अळीनंतर पुन्हा तीच पद्धत?

याआधी काही दिवसांपूर्वी हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही असाच प्रकार दिसून आला होता. त्यावेळी एकदा निवेदन दिल्यानंतर विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी मागणी लावून धरल्यानंतर तो विषय शासन स्तरावरील असल्याने आमदार महाले यांनी अधिवेशनात गाजवला होता.मात्र तेव्हाच क्रांतीकारी संघटनेचे विनायक सरनाईक, नितिन राजपुत तहसिल कार्यालयात उपस्थित असतांना क्रांतीकारी संघटनेचे इतर सहकारी पुढे करत दुसऱ्यांदा मागणी करण्यात आली होती.यामुळे गट पाडले जात असल्याचे समोर आले होते.आता ढगफुटीच्या नुकसानीवरही तशीच पुनरावृत्ती झाल्याने,”नेमके क्रांतिकारी शेतकरी संघटनेत चालले काय?”हा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये गाजू लागला आहे.

“१७ वर्षांची साथ, संघटनेतच राहणार”….

या संदर्भात नितीन राजपूत आणि विनायक सरनाईक यांना बुलडाणा कव्हरेजने फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट सांगितले —”आम्ही गेले १७ वर्षे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली खांद्याला खांदा लावून काम केले आहे.आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेतच आहोत हा लढा हा शेतकऱ्यांसाठी आहे.जो काम करतो त्याला संपवने अशक्य असतं याचा प्रत्यय आम्हाला आहे याचे उत्तम उदा रविकांत तुपकर आहेत.त्यांना संपवनाचा प्रयत्न झाला ते संपले का?नाही ना? मग आम्ही कसे संपनार असी देखील प्रतिक्रिया सरनाईक,राजपुत यांनी बोलताना दिली आम्ही चळवळीत काम करणारे त्यामुळे संघर्ष आमच्या रक्तात असल्याचे त्यांनी सांगितले..

तुपकरांची भूमिका महत्त्वाचे….!

या घडामोडींवर अद्याप रविकांत तुपकर यांनी कोणतीही सार्वजनिक भूमिका घेतलेली नाही. मात्र, विश्वासू सहकाऱ्यांना डावलून नवे गट निर्माण करण्याच्या चर्चेमुळे त्यांना आता संघटनेतील वातावरणावर लक्ष केंद्रीत करावे लागेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्तुळातून व्यक्त होत आहे.

तुपकर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

नैसर्गीक आपत्तीमुळे जिल्ह्यात अनेकवेळा शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा रविकांत तुपकर,शर्वरी तुपकर यांनी अनेकवेळा नितिन राजपुत,विनायक सरनाईक या सहकाऱ्यांना सोबत घेत बांधावर जात पाहणी केल्याचे दिसून आले होते मात्र आता तुपकर जिल्ह्यात नसतांना जुन्या सहकाऱ्यांना डावलून जर असे निवेदन देणे व पाहणीचे विषय होत असल्याने नेतृत्वाचे संघटनेकडे दुर्लक्ष झाले का?असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!