EXCLUSIVE : चिखलीत नगराध्यक्ष उमेदवार पदासाठी शिवराज पाटील यांचे नाव चर्चेत; तरुणांच्या गप्पांत पुन्हा रंगत! राजकारणातून अलिप्त असले तरी ‘युवकांच्या मनात अजूनही आहेत पाटील’…! स्वयंघोषित भावी नगराध्यक्ष उमेदवारला डोक्याला ताण?

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शहरातील तरुणांच्या चर्चांमध्ये सध्या एकच नाव जोमाने घेतले जात आहे .सामाजिक कार्यकते शिवराज पाटील. गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळापासून दूर राहिलेल्या पाटील यांचे नाव मात्र पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून दावेदारांच्या चर्चेत अग्रस्थानी दिसत आहे!

गेल्या निवडणुकीत त्यांनी युवकांची मोठी फळी सोबत घेत, प्रचारात दमदार उपस्थिती दाखवली होती. मात्र अलीकडच्या काळात ते अचानक शांत झाले आणि राजकीय दृष्टीने काहीसे ‘गायब’ झाल्याचे चित्र दिसले. तरीही चिखलीतील तरुण वर्ग आजही त्यांना विसरलेला नाही. शहरातील गप्पांच्या ठिकाणी, चौकांमध्ये आणि सोशल मीडियावरही पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे.

काही स्वयंघोषित भावी नगराध्यक्षांनी आपली गुडघ्याला बांधलेली “बांशीग” आता घट्ट बांधून ठेवली असली, तरी शिवराज पाटील राजकीय मैदानात उतरणार का? हेच आता सगळ्यांच्या कुतूहलाचे कारण बनले आहे.

राजकारणातून सध्या अलिप्त असले तरी त्यांचा प्रभाव अजूनही युवकांच्या मनावर आहे. त्यामुळे पाटील स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का? की कोणाला थेट पाठिंबा देतात? हे येणारा काळच ठरवेल.

युवकांचा हातात फोटो च्या माध्यमातून दिसले..!

या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात शिवराज पाटील प्रत्यक्ष हजर नव्हते, पण तरीही युवकांच्या हातात झळकणाऱ्या त्यांच्या फोटोमुळे त्यांची उपस्थिती जाणवत होती, “मनाने दूर नाहीत, भावनेने अजूनही जवळ आहेत पाटील!”

चिखलीच्या राजकारणात ‘शिवराज पाटील कार्ड’ कोण खेळतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!