बोले तसं चालते, त्याची वक्तृत्व चालते…! चिखली नगर परिषदेत राणा सुरेंद्रसिंह ठाकूर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड…

चिखली(बुलडाणा  कव्हरेज न्युज) : दयावान फाउंडेशनचे प्रवक्ते राणा सुरेंद्रसिंह ठाकूर यांची चिखली नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या राणा सुरेंद्रसिंह ठाकूर यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे.

त्यांच्या निवडीमुळे चिखली शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या निवडीबद्दल दयावान फाउंडेशन, चिखली विकास संघ तसेच चिखलीतील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.“बोले तसं चालते, त्याची वक्तृत्व चालते…” या उक्तीप्रमाणे त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि नेतृत्वगुणांचा लाभ चिखली शहराला निश्चितच होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

“केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र… आणि चिखलीत सुरेंद्र!”

स्वीकृत नगरसेवकपदी निवड होताच चिखली शहरात ही घोषणा चर्चेचा विषय ठरली आहे. शहराच्या राजकीय वर्तुळात, चहाच्या टपऱ्यांपासून चौकाचौकांत हीच चर्चा ऐकायला मिळत असून, सुरेंद्र यांच्या नेतृत्वाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीतून चिखलीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!