चिखलीत दुर्दैवी घटना!मेहकर फाटा येथील हॉटेलच्या बाथरूममध्ये तरुणाचा पडून मृत्यू….!

shok death

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)– चिखली शहरातील मेहकर फाटा परिसरात असलेल्या हरदेव हॉटेलमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


संतोष प्रकाश बळप (वय ३३, रा. रामनगर, चिखली) हा तरुण सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेलमधील बाथरूममध्ये अचानक घसरून पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ चिखली येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.


घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल कडूबा मुंडे (ब.क्र. १७४) पुढील तपास करत आहेत.
प्राथमिक तपासानुसार हा अपघाती मृत्यू असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृत संतोष हा प्रकाश दगडू बळप यांचा मुलगा असून, अचानक झालेल्या या घटनेने बळप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!