बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी महिलेला मोठा आर्थिक फटका दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील शुभांगी अतुल बुरसे या औषधनिर्मिती व्यवसायात कार्यरत असलेल्या महिला एस.टी. बसने जळगाव (खानदेश) येथे जात होत्या.
प्रवासादरम्यान कळमनुरी ते मोताळा दरम्यान त्यांच्या बॅगेतील दागिने व रोख रक्कम असा तब्बल १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये –
सोन्याचे गंठण (३.५ तोळे)
कानातील सोन्याचे जोड (४ ग्रॅम)रोख ३ हजार रुपये असा ऐवज होता.
मोताळा येथे पोहोचल्यानंतर शुभांगी बुरसे यांनी बॅग तपासली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.











