बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारी वाढल्याचे चित्र समोर आले असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल २७ खून आणि ४४ जीवघेण्या हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत.
पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व घटनांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास सुरू आहे. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
या खुनांमागची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत –
अनैतिक संबंध, संपत्तीचे वाद, हुंड्याची मागणी, घरगुती भांडणे, व्यसनाधीनता, जमिनीचे वाद,विशेषतः मद्यपानामुळे होणाऱ्या वादांमधून अनेक वेळा हिंसक घटना घडल्याचे उघड झाले आहे.
गतवर्षी याच कालावधीत २३ खून झाले होते, तर यावर्षी हा आकडा २७ वर पोहोचला आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई सुरू असली तरी गुन्हेगारी नियंत्रणात न येता ती वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
1 thought on “बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय; पाच महिन्यांत २७ खून, ४४ जीवघेणे हल्ले…”