बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : बुलढाणा शहरात आणखी एक धक्कादायक खून झाला आहे. रविवारी (२१ सप्टेंबर) रात्री १० वाजता बस स्टँड मागील भागातील जांभरून रोडवर चाकू भोसकून २७ वर्षीय शुभम रमेश राऊत याचा खून झाला.ही घटना राऊत कॉम्प्लेक्सजवळील नाईटी चौकात घडली. आरोपीचे नाव ऋषी जवरे असून, तो गुंड प्रवृत्तीचा असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम बोथरा एमआरआय सेंटरमध्ये नोकरी करत होता. घटनेच्या वेळी तो आपल्या मित्र बॉबी दोघे याच्यासोबत गावंडे हॉटेलमध्ये जेवत होता.दरम्यान हातात चाकू घेऊन नशेत असलेला ऋषी जवरे तेथे आला. त्याचे कुणाशी तरी भांडण झाले होते. तो चाकूने कुणाला तरी मारेल, या भीतीने शुभम त्याच्याकडे गेला; परंतु भानावर नसलेल्या ऋषीने थेट शुभमच्या छातीत चाकू खुपसला. शुभम आणि बॉबीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शुभम कोसळला. यावेळी बॉबीच्या पायाला जखम झाली, तर प्रतिकारादरम्यान ऋषीलाही चाकू लागला.शुभमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तो वाचू शकला नाही. रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. शुभमच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान, गेल्या महिन्यात १ ऑगस्ट रोजी चिखली रोडवर सनी जाधवचा चाकू हल्ल्यात खून झाला होता. दीड महिन्याच्या आत बुलढाण्यातील हा दुसरा खून आहे.
चुकीने गाजा उल्लेख झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे…
शुभम राऊत याला कोणत्याही प्रकारच्या व्यसन नव्हते











