अकोला (बुलडाणा कव्हरेज न्यूज)– मुर्तिजापूर तालुक्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीने मिळून एका व्यक्तीला “खोट्या प्रेमाचा जाळा” टाकून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली आणि तब्बल 18 लाख 74 हजार रुपये खंडणी म्हणून उकळले. मात्र, लोभाने अंध झालेल्या दाम्पत्याने पुन्हा 5 लाखांची मागणी केली आणि अखेर पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले.
जाहिरात…☝️
घटनेची माहिती …
16 जून रोजी फिर्यादीची ओळख स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एका महिलेशी झाली. तिचं नाव लता नितेश थोप (30, रा. खरबढोरे, ता. मुर्तिजापूर) असं सांगितलं.
तिने सुरुवातीला मैत्री केली आणि नंतर घराला बोलावलं.
फिर्यादी घरी गेल्यावर तिचा पती नितेश प्रभाकर थोप (39) अचानक आला आणि खोट्या बलात्कार प्रकरणाची धमकी देत फोटो काढले.
बदनामीच्या भीतीने फिर्यादीने सुरुवातीला 3 लाख दिले. नंतर धमक्या देत दाम्पत्याने रोख व ऑनलाईन मिळून 18 लाख 74 हजार रुपये उकळले.
पोलिस कारवाई :
30 ऑगस्टला पुन्हा 5 लाखांची मागणी झाली. मात्र, फिर्यादीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी सापळा रचला आणि 1 लाख स्वीकारताना मुर्तिजापूर-अकोला रोडवरील टोलनाक्यावर दाम्पत्याला रंगेहाथ पकडलं.
या प्रकरणाचा तपास पो.उप.नि. चंदन वानखडे करत असून स.पो.नि. श्रीधर गुठे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.











