चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)
भरोसा येथील थुट्टे कुटुंबाने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ही वेदनादायी घटना समजताच भारतीय जनता पक्ष व भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत माणुसकी दाखवत ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
गणेश थुट्टे आणि त्यांच्या पत्नी रंजनाताईंनी आत्महत्या केल्याने त्यांच्या मुलामुलींचे आयुष्य अंधारात गेले आहे. या प्रसंगात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे, कृष्णा सपकाळ, विष्णू घुबे यांनी थुट्टे कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वन केले व आर्थिक मदतीचा हात दिला.
विशेष बाब म्हणजे, या पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजीवर खर्च न करता तो पैसा थेट गरजू कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे ३१ हजारांची रक्कम थेट थुट्टे कुटुंबाच्या हाती देण्यात आली.
या वेळी शिवशंकर सुरडकर, गजेंद्र म्हस्के, राजेश जावळे, योगेश गवते, गजानन झाल्टे, प्रा. दीपक मुरकुटे, रामदास जाधव, निखिल पडघान यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भाजपच्या या मदतीने समाजात सकारात्मक संदेश गेला असून गरजूंच्या मदतीसाठी अशी पावले उचलली गेली पाहिजेत, अशी भावना व्यक्त होत आहे. भविष्यात इतर सामाजिक घटकांनीही पुढे येण्याची गरज आहे.