“मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, तुला जे करायचे असेल ते कर, माझा तुझ्याशी काही संबंध नाही,” गर्भपात करून फसवणूक; तरुणा विरोधात गुन्हा दाखल..

सख्या दोन बहिणी मैत्रिणींकडे जाऊन येतो, असे घरी सांगून गेल्या. त्यानंतर परत आल्या नाही....

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील जानेफळ येथील एका ३० वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर गर्भधारणा झाल्यावर पीडितेचा गर्भपात करवून घेत फसवणूक केली. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीष भुजंगे याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे संबंधित तरुणी गर्भवती झाली. गर्भधारणा लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करवून घेतला.

त्यानंतर पीडितेला “मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, तुला जे करायचे असेल ते कर, माझा तुझ्याशी काही संबंध नाही,” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.पीडितेच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on ““मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, तुला जे करायचे असेल ते कर, माझा तुझ्याशी काही संबंध नाही,” गर्भपात करून फसवणूक; तरुणा विरोधात गुन्हा दाखल..”

Leave a Comment

WhatsApp Join Group!