शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शेगाव पोलिसांनी नांदुरा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप राखोंडे आणि मोहन राखोंडे (दोघे रा. सिंधी कॉलनी, माळीपुरा, नांदुरा) यांची एका तरुणीशी मोबाईलवरून ओळख झाली. त्यानंतर आरोपी संदीप राखोंडे याने लग्नाचे आमिष दाखवून शेगाव येथील गेस्ट हाऊसमध्ये तसेच मलकापूर परिसरातील शेतात वेगवेगळ्या वेळेस त्या तरुणीवर अत्याचार केला.काही महिन्यांनी संबंधित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिने ही बाब मोहन राखोंडे याच्याशी बोलून सांगितली असता, त्याने तिला गप्प राहण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात संदीप राखोंडे आणि मोहन राखोंडे या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 64(1), 64(2)(M) आणि 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारंगे हे करीत आहेत.











