चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याच कारणामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली येथील तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.
आज दुपारी एक वाजे दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या सह शेतकऱ्याने ठिय्या आंदोलन सुरू आहे मात्र त्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा त्यांना माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. पिक विमा जिल्हा प्रतिनिधी यांना फोन द्वारे संपर्क साधून त्यांनी फोन बंद करून ठेवला त्यामुळं जो पर्यंत पिक विमा मिळणार नाही तो पर्यंत आम्ही कृषी कार्यालयात ठिय्या सुरू राहील अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी केली आहे.
आज तालुका कृषी कार्यालयात मुक्काम करणार असल्याचे शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, तालुक्यातील काही गावांना पीक विम्याचे पैसे मिळाले असले, तरी देऊळगाव घुबे आणि इतर काही गावांचे शेतकरी अजूनही वंचित आहेत. यामुळे नाराज शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
काही शेतकऱ्यांनी असेही सांगितले की, त्यांच्या शेताचे पंचनामे झालेले असूनही त्याचा लाभ मिळालेला नाही. “आम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार? आणि मिळणार की नाही?” असे प्रश्न आंदोलक शेतकऱ्यांनी विचारले. यामुळे उपस्थित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना उत्तरं देताना अडचणींचा सामना करावा लागला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की तीन तास उलटूनही अजून शेतकरी कार्यालय सोडायला तयार नाही त्यामुळं आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचे होत आहे, जर लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. प्रशासन आणि विमा कंपन्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.