अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – अंढेरा पोलिसांनी जलद कारवाई करत चोरीस गेलेली चारचाकी गाडी हस्तगत केली असून, एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.
माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री मेरा खुर्द (ता. चिखली) येथील विश्वास पाखरे यांच्या घरासमोर उभी असलेली एमएच ०४ एफआर २३१५ क्रमांकाची गाडी अज्ञात चोरट्याने पळवली होती. दुसऱ्या दिवशी (९ ऑगस्ट) पाखरे यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना कळाले की स्वप्नील तुकाराम बुरकुल (वय २१, रा. भरोसा, ता. चिखली) हा चोरीच्या वाहनासह ११ ऑगस्ट रोजी येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहात पकडले.
पंचासमक्ष गाडी जप्त करण्यात आली असून, आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.











