अचानक कुत्रा समोर आल्याने दुचाकी अपघात; महिलेचा मृत्यू……

लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना...

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मुलीला भेटण्यासाठी पतीसोबत निघालेला प्रवास एका महिलेच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला. अंजनी बु येथील दुर्गाबाई परमेश्वर पदमने (वय ४३) यांचा १२ ऑगस्ट रोजी वाशीम जिल्ह्यातील पिंपरी सरहद्द येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास मुंबई–नागपूर राज्य महामार्गावर उतावली नदीजवळ त्यांच्या मोटारसायकलसमोर अचानक एक कुत्रा आला. चालकाने तात्काळ ब्रेक मारताच मागे बसलेल्या दुर्गाबाई रस्त्यावर पडल्या. पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.दुर्गाबाई या सहा मुलींच्या आई होत्या. त्यापैकी दोन मुली विवाहित आहेत, तर चार मुली विवाहयोग्य वयाच्या आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या भेटीसाठी गेलेली आईची भेट कायमची अधुरी राहिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!