Advertisement Advertisement

दुपारी बाजारात गेलेली अल्पवयीन पोरगी घरी परतलीच नाय; तरुणावर पळवून नेल्याचा संशय!

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी घडली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एका तरुणावर तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी १ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास आसलगाव बाजार परिसरातून बेपत्ता झाली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान, कुटुंबीयांनी एका तरुणाने मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत जळगाव जामोद पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून मुलीचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!