Advertisement Advertisement

खामगावात श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी आगमन; नगर परिक्रमा अन् बुधवारी पहाटे शेगावकडे प्रस्थान…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे परतीच्या प्रवासात मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी खामगाव शहरात आगमन होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी शहरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सकाळी श्री गजानन महाराजांची पालखी हनुमान व्हिटॅमिन येथे दाखल होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता पालखीच्या नगर परिक्रमेला सुरुवात होईल. शहरातील विविध मार्गांवरून पालखी मार्गस्थ होणार असल्याने भाविकांना ठिकठिकाणी श्रींचे दर्शन घेता येणार आहे.

बुधवारी पहाटे पालखी वाल्मीक चौक, विकमसी चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, टिळक पुतळा, अर्जुन जल मंदिर, मेन रोड, जगदंबा चौक, महावीर चौक, मोहन चौक, फरशी, महावीर भवन, एचडीएफसी बँक आणि खामगाव अर्बन बँकेसमोरून मार्गस्थ होईल.

यानंतर दुपारी सुमारे ३ वाजता श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात पालखी पोहोचणार आहे. येथे भाविकांना श्री गजानन महाराजांचे दर्शन घेता यावे यासाठी पालखी काही काळ मुक्कामी राहणार आहे.

दरम्यान, बुधवार, १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता श्री गजानन महाराजांची पालखी खामगावहून शेगावकडे प्रस्थान करणार आहे. या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!