चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली नगरपालिकेच्या निकालानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते. नगराध्यक्ष पदासाठी पंडित दादा देशमुख विजयी झाले असून भाजपचे एकूण १३ नगरसेवक निवडून आले आहेत. विजयानंतर शहरात मिरवणुका काढण्यात आल्या.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजप नगरसेवक दत्ता सुसर हे मतदारांचे आभार मानत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या काही तरुणांनी त्यांच्या कुटुंबावर हल्ला केल्याची माहिती आहे. यानंतर काही काळ दोन्ही गटांत वाद व हाणामारी झाली. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे.











