जुन्या पेन्शनसाठी आ. मनोज कायंदे विधानसभेत आक्रमक; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):
शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत आक्रमकपणे मांडला. गेल्या १० वर्षांपासून कर्मचारी अन्याय सहन करत असून त्यांची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

विधानसभेत बोलताना आ. कायंदे म्हणाले की, जाहिरात तारीख किंवा जॉइनिंग डेटसारख्या तांत्रिक कारणांवरून कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. तारीख एकच असताना कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल, तर तो तात्काळ दूर केला पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी त्यांनी पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, धोबी समाज तसेच इतर शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांचा विशेष उल्लेख केला. या सर्व घटकांवर होणारा अन्याय शासनाने थांबवावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

कर्मचाऱ्यांच्या भावना मांडताना आ. कायंदे यांनी शासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, कर्मचाऱ्यांची आंदोलने व उपोषणे गांभीर्याने घ्यावीत. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी भर सभागृहात केली.

हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेसाठी आमदार कायंदे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे कर्मचारी वर्गातून स्वागत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!