भरधाव रोड ने जाणाऱ्या प्रवासी ऑटोची बैलगाडीला धडक; एक प्रवासी बालक जागीच ठार तर चार प्रवासी जखमी…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)भरधाव जाणाऱ्या प्रवासी ऑटोरिक्षाने बैलगाडीला धडक दिली. या अपघातात ऑटो मधील एक प्रवासी बालक जागीच ठार झाला असून ऑटो चालकासह चार प्रवासी जखमी झाले आहेत. ही रात्री साडे सात वाजेच्या सुमारास भोरसी मंदिराजवळ घडली.

मृतक शेख रहीम घटना २० ऑक्टोबर रोजी

तालुक्यातील माटरगाव बुद्रुक येथील शेख परवेज उर्फ पप्पू शेख मेहबूब हा आपल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या एम.एच.२७ बी डब्ल्यू २८८ या क्रमांकाच्या ऑटोमधून शेख रहिम शेख इस्माईल (क्य १६) शेख फैजान शेख अकिल व शेख खय्युम शेख नबी सर्व रा माटरगाव बुद्रुक यांना २० ऑक्टोबर रोजी खामगाव वरून माटरगाव कडे घेऊन जात असताना मार्गावरील भोरसी मंदिराजवळ रात्री साडे सात वाजेच्या सुमारास ऑटोने

बैलगाडीला धडक दिली. या अपघातात शेख रहिम शेख इस्माईल नामक १६ वर्षीय बालक जागीच ठार झाला आहे. तर ऑटो मधील शेख फैजान शेख अखिल, शेख कव्युम शेख नबी व ऑटो चालक शेख परवेज शेख मेहबूब हे तिघे व बैलगाडी चालक नरवाडे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर ऑटो चालक व दोन प्रवासी अशा तिघांना उपचारार्थ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात शेख फैय्युम याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. अपघात प्रकरणी जलंब पोलिसांनी शेख हारुण शेख मेहबूब रा. माटरगाव बुद्रुक यांनी २२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ऑटो चालक शेख परवेज उर्फ पप्पू शेख मेहबूब याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका नन्हेखॉ तडवी हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!