मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता घडली. या प्रकरणी २२ ऑक्टोबर रोजी बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ती किराणा दुकानावर असताना गावातील श्रावण निना पानपाटील हा तेथे आला आणि “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत तिचा विनयभंग केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली असता, गावातील एक व्यक्ती तेथे आला. त्यानंतर आरोपी श्रावण पानपाटील हा घटनास्थळावरून पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेवरून बोराखेडी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.











