बुलडाणा अर्बनच्या कर्मचाऱ्याचा ट्रकच्या अपघातामध्ये जागीच मृत्यू प्रतिनिधी…!

लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना...

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज)ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात ऐन दिवाळीच्या दिवशी मंगळवारी २१ सायंकाळी अमडापूर – चिखली मार्गावर घडला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव विजय ओंकार गिरी (क्य ४५, रा. डोंगर खंडाळा) असून, ते बुलडाणा अर्बनच्या मुख्य

विजय गिरी ऑक्टोबर रोजी

शाखेत कार्यरत होते. विजय गिरी मंगळवारी सायंकाळी दुचाकीने (क्रमांक एमएच २८ एए ६०९४) हिवरा आश्रमकडे जात होते. या दरम्यान अमडापूरजवळील महादेव मंदिर परिसरात अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की विजय गिरी ट्रकखाली चिरडले गेल्याने त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले. अपघातानंतर चालक ट्रकसह घटनास्थळावरून पळून गेला. या अपघाताची माहिती मिळताच अमडापूर येथील काही तरुण आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अमडापूर

पोलिस फरार ट्रकचालकाचा शोध घेत आहेत. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या अवघ्या एक तास आधी ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण डोंगर खंडाळा गावावर शोककळा पसरली आहे. विजय गिरी यांच्या मातोश्री चंद्रकलाबाई गिरी यांचेही अवघ्या १६ दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. विजय गिरी यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून, त्यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. विजय गिरी हे मनमिळावू स्वभावाचे असल्याने बँक व सामाजिक क्षेत्रात ते परिचित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!