मंगरुळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) – विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेनं दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तो वारंवार शिवीगाळ करून “तुझ्या आईची अर्धी शेती माझ्या नावावर करून दे, नाहीतर वीस लाख रुपये आईकडून आण” असा तगादा लावत असे. या कारणावरून त्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.
हा छळाचा प्रकार १० डिसेंबर २००३ पासून ते ३१ मार्च २०२२ पर्यंत सुरू होता. दरम्यान, पतीकडून तिला जीव घेण्याच्या धमक्या देण्यात आल्याचंही तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा कायम अप क्र. ३३३/२५ अंतर्गत कलम ८५, ३५२, ३५१(२) भा.दं.सं. (BNS) नुसार नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी दिलीप तोंडे करीत आहेत.











