साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज)पोलिस स्टेशन अंतर्गत राजेगाव येथील एका विवाहित महिलेचा पैशाच्या कारणावरून छळ केल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे राजेगाव येथील केशव हरिभाऊ अवचार यांच्या अंजली नामक मुलीचा विवाह उकळी येथील सतीश गजानन झोरे यांच्या सोबत २९ फेब्रुवारी २०२४ मध्ये झाला होता .
त्यानंतर सहा महिने दोघांचा संसार व्यवस्थित चालला महिन्यांनंतर वडीलांकडून पाच सहा लाख रुपये घेऊन ये! असा सतत ही तकादा लावला. परंतू वडीलांची परिस्थिती जेमतेम असल्याने ते पैसे देऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी अंजली हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला माहिती अंजली हिने वडीलांना फोनवर सांगितली. वडील केशव अवचार हे उकळी येथे गेले असता त्यांनी सतीश व सासरे गजानन झोरे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली वडीलांनी मला माहेरी राजेगाव येथे आणले. काही दिवसांनी सतीश हा राजेगाव येथे आला. आणि वडीलांसोबत भांडण
करून मला जबरदस्तीने उकळी येथे घेऊन गेला त्यानंतर पुन्हा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला माझ्या पतीचे भालगाव थेथील एका मुलीसोबत लफडे असून माझ्या बद्दल काही एक तक्रारी त्या मुलीला पाठवित असत. येवढेच नाही तर गुरांचे शेण काढीत असताना माझा व्ही डी ओ काढून त्यावर चिटींग करीत तो त्या मुलीला पाठवित असे साखरखेर्डा पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सतीश झोरे, सासरे गजानन झोरे, व सासू, यासह आठ व्यक्तिविरुध्द भारतीय न्याय संहिता १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.











