मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मानवी आरोग्यास हानीकारक असलेला १ कोटी ४३ लाख रुपये किमतीचा गुटखा पकडून ट्रक चालकासह तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई आज ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली.
स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी स्वतंत्र पथके तयार केले. दरम्यान, आज मंगळवारी पथकाला काही व्यक्ती हे त्यांच्या ताब्यातील दोन ट्रकमध्ये सुगंधित पान
मसाला व गुटखा बाळगून त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अमरावती कडून समृद्धी महामागनि मुंबईकडे जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने मेहकर हद्दीतील समृद्धी महामार्गावरील फर्दापूर टोलवर सापळा रचून गुटख्याची वाहतुक करणाऱ्या दोन्ही ट्रकला पकडून मो इम्रान मो. हफिज (क्य २८) रा. बियाबानी मोहल्ला, अचलपूर जि. अमरावती, अजीम बेग हाफिज बेग (वय ३६) रा. अन्सारनगर, अमरावती व एजाज अहेमद अजीज अहेमद (वय ३१) रा. शिरजगाव ता. चांदूरबाजार जि.
अमरावती या तीन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक प्रताप बाजड, अविनाश जायभाये, पोहेकॉ. शरद गिरी, दीपक लेकुरवाळे, पुरुषोत्तम आघाव, गणेश पाटील, पोकॉ. नीलेश राजपूत, महिला पोलिस कर्मचारी पूजा जाधव, चालक पोहेका समाधान टेकाळे व तांत्रीक विभागाचे पोहेकॉ राजू आडवे, पोकों ऋषिकेश खंडेराव यांनी केली आहे.











