चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतीच्या हिस्से वाटपाच्या वादातून पोटच्या मुलानेच आई-वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही सवडत येथे २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव त्रंबक चोपडे (वय ७५) व त्यांची पत्नी कलावती महादेव चोपडे (वय ७०) यांचा मुलगा गणेश महादेव चोपडे (वय ३५) याने वादाच्या भरात बाजीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून दोघांचा जागीच खून केला.
घटनेची माहिती मिळताच मुसळधार पावसातही अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री साडेनऊच्या सुमारास फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा व रक्तनमुने घेण्याचे काम सुरू केले होते.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खुनांच्या घटनांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.











