मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) उसनवारीच्या पैशाच्या कारणावरून फायटरने तथा चाकूने मारहाण केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास घुस्सर येथे घडली याप्रकरणी २४ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील घुस्सर येथील विनोद सरदार जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास गावातील विनोद ज्ञानदेव जाधव यांच्याकडे असलेले उसनवारीचे वीस हजार रुपये फिर्यादीला परत देण्याच्या कारणावरून विनोद ज्ञानदेव जाधव, दीपक ज्ञानदेव
जाधव, करण विनोद जाधव, अंतरिक्ष विनोद जाधव यांनी फिर्यादीस चापटाबुक्यांनी मारहाण करून विनोद जाधव याने फिर्यादीला लोखंडी फायटरने नाकावर मारून जखमी केले. तसेच फिर्यादीचा पुतण्या अभिषेक याला करण जाधव याने उजव्या डोळ्याच्या खाली चाकू मारून जखमी केले. दरम्यान, सरला निनाजी जाधव व निनाजी जाधव हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना दीपक जाधव व अंतरिक्ष जाधव यांनी चापटाबुक्यांनी मारहाण करून शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकों विजय सुरडकर, पोकों ढोले करत आहेत.











