अकोल्यात तुपकरांचं वादग्रस्त विधान; “शेतकऱ्यांना न्याय मिळवायचा असेल तर नेत्यांना नेपाळसारखं तुडवावं लागेल”!

ravikant tupakar

अकोला (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) – अकोल्यात रविवारी झालेल्या ‘शेतकरी लूटवापसी संवाद सभेत’ शेतकरी नेते बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांनी केलेल्या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावेळी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आपली जमीन विकू नका असे आवाहन केले.सभेत बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट नेपाळमधील एका घटनेचा उल्लेख केला.

त्यांनी म्हटलं –“आज शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवायची असेल, त्यांना न्याय द्यायचा असेल तर मोठं आंदोलन उभारावं लागेल. नेपाळमध्ये जसं आंदोलनादरम्यान घडलं, तसंच इथेही दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाही.”त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज आहे का? असा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

दरम्यान, या सभेत बच्चू कडू यांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या धोरणांचा निषेध करत सरकारवर टीका केली. तर, राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट इशारा दिला –“जमीन विकू नका, कारण जमीन गमावली तर शेतकरीचं अस्तित्व संपेल. लढाई कितीही लांबली तरी हक्कासाठी लढत राहा.”अकोल्यात झालेल्या या सभेतील वक्तव्यांमुळे राज्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तुपकर यांच्या वक्तव्यावरून आगामी काही दिवसांत तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!