अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांसोबत मजबुतीने उभे राहू; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आमदार महाले यांचे आवाहन..

अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांसोबत मजबुतीने उभे राहू; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आमदार महाले यांचे आवाहन..

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हे संकट कितीही कठीण असले तरी आपण सर्व मिळून त्यावर नक्कीच मात करू, असा विश्वास आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, मी माझ्या मतदारसंघातील शेतकरी बंधू-भगिनींसोबत मजबुतीने उभी आहे आणि या दुःखद परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मी दिवसरात्र प्रयत्न करेन.

महाराष्ट्रात पावसाचा तडाखा! 10 लाख एकर पिके उद्ध्वस्त, पंचनामे कधी होणार?

या अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागांत पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून, आमदार महाले पाटील यांनी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. आज उत्रादा, पेठ, बोरगाव काकडे आणि पांढरदेव या गावांमध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंकुशराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली फिरून मदतकार्य करत होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार शेकडो कार्यकर्ते या भागात सक्रिय आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार संतोष काकडे आणि कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Buldhana Murder Case: 19 वर्षीय सनी जाधव याच्या हत्येने बुलढाणा हादरले, प्रेमप्रकरणातून खूनाचा संशय

आमदार महाले पाटील यांनी सांगितले की, या नुकसानीचे व्हिडिओ पाहून माझे मन अतिशय व्यथित झाले आहे. शेतकरी राजाला या संकटातून सावरण्यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन, हा माझा जनतेला दिलेला शब्द आहे. त्या सध्या लंडनमध्ये असून, तेथे लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र, मतदारसंघातील अतिवृष्टी आणि नुकसानीची माहिती व्हिडिओद्वारे मिळताच त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या. तसेच, भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन करून संकटग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी प्रेरित केले.

महाराष्ट्र हादरला! महिलांना गोड बोलून जंगलात न्यायचा अन्… क्रूर सिरीयल किलरच्या अटकेने परिसरात खळबळ

शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे पाहता, सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन आमदार महाले पाटील यांनी दिले आहे. ही मदत प्रक्रिया जलद गतीने होण्यावर माझे विशेष लक्ष असेल. आजच्या पाहणी दौऱ्यात जिल्हा उपाध्यक्ष एकनाथराव जाधव, तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. माया म्हस्के, अमडापूर मंडळ अध्यक्ष अमोल साठे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बंडू अंभोरे, लक्ष्मण शेळके पाटील, सुरेश इंगळे पाटील, अनमोल ढोरे, संदीप म्हस्के, चेतन म्हस्के, सरपंच रमेश इंगळे यांच्यासह तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांसोबत मजबुतीने उभे राहू; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आमदार महाले यांचे आवाहन..”

Leave a Comment

WhatsApp Join Group!