सिल्लोड मध्ये १६ वर्षीय मुलगी दुचाकी वरून पळाली; पण पळून जाता जाता भसकन त्या…… ! २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल..

जन्मदात्या बापाने केला अकरा वर्षाच्या मुलीवर….! – आईने झाऱ्याने फोडले हात, पोलिसांत गुन्हा दाखल!

सिल्लोड (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) — सिल्लोड शहरातील मिर्झा कॉलनी येथील १६ वर्षीय मुलीला २८ वर्षीय तरुणाने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव अरबाज भिकन शेख (वय २८, रा. मिर्झा कॉलनी, सिल्लोड) असे आहे.तक्रारीनुसार, ७ ऑगस्टच्या रात्री कुटुंबासह जेवण करून सर्वजण झोपले होते.

८ ऑगस्टच्या सकाळी सहा वाजता मुलगी घरात दिसली नाही. घराचे लोखंडी गेट बाहेरून लावलेले होते. शोधाशोध केली असता ती नातेवाइकांकडेही गेली नसल्याचे समजले. याच दरम्यान, गल्लीत राहणारा अरबाजही घरी नसल्याचे कळले.सिल्लोड शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ८ ऑगस्टच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास मुलगी ही अरबाजच्या दुचाकीवर बसून जाताना दिसली.

दोघे संभाजी राजे चौक व महाराणा प्रताप चौकातून गेले असल्याचे फुटेजमध्ये आढळले. मुलगी ११ वीची विद्यार्थिनी आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!