बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांचा माहोल तापू लागला आहे. भाजप आणि शिंदे सेना आक्रमकपणे तयारीला लागली असून, उबाठा गटही मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या आंदोलनातून कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.यामध्ये मात्र आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित राहिल्याचे दिसते. २०२२ साली पंचायत समित्यांच्या आरक्षणात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चार जागा होत्या, पण तेव्हा निवडणुका झाल्याच नाहीत. आता पुन्हा तेच आरक्षण राहील की नव्याने काढले जाईल, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.दिवाळी अवघ्या दोन महिन्यांवर आली असून, त्याआधीच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली, पक्षप्रवेश, आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
२०२२ मधील पंचायत समिती आरक्षण (तेव्हा नियोजित)…..
नुसूचित जातीसाठी ३ जागा (त्यापैकी २ महिलांसाठी)अनुसूचित जमातीसाठी १ जागानागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ४ जागा (त्यापैकी २ महिलांसाठी)सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५ जागा (त्यापैकी ३ महिलांसाठी)तेरा पैकी सात जागा महिलांसाठी राखीव..
राजकीय आघाड्यांची स्थिती…
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट आघाडीवर असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राज्यातील कामात गुंतल्याने जिल्हा पातळीवरील जबाबदारी जिल्हाध्यक्षांवर आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद प्रामुख्याने राजेंद्र शिंगणे यांच्या बळावर आहे. त्यांनी सिंदखेडराजा येथे मोर्चा काढून पक्ष सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला.
भाजप आणि शिंदे सेनेची मोहीम….
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीतील नुकसानभरपाईपासून दौऱ्याची सुरुवात केली असून, १५ ऑगस्टलाही दौरा अपेक्षित आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयराज शिंदे यांच्या बळावर सर्व पंचायत समित्या ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे.शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखली, मलकापूर आणि खामगाव येथे बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सक्रिय केले.














