चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – आज दुपारी सुमारे १२ वाजता अमोना ते देऊळगाव घुबे रोडवर धक्कादायक घटना घडली. रस्त्याच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीने काळवीट बांधून ठेवला होता. त्यावेळी दोन जण तेथे थांबले असता, त्या व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानक चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने चिखलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या व्यक्तीच्या कानाला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनास्थळी संशयिताच्या तीन गाड्या उभ्या आढळल्या असून काळवीट देखील तेथे बांधलेले आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या वन विभाग आणि पोलीस पथक घटनास्थळी पंचनामा करत असून ग्रामस्थांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.