शेती नावावर न केल्याच्या रागातून नातवाने केली आजीची हत्या; गोसिंग येथील घटनेने खळबळ…

खामगावात महिलेला घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) –नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथे ५ ऑगस्ट रोजी शेती नावावर करून देत नसल्याच्या रागातून नातवाने ७५ वर्षीय अंजनाबाई सुरडकर यांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवीण शांताराम सुरडकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वादाची पार्श्वभूमीत….

क्रारदार दिलीप ओंकार सुरडकर यांच्या आई अंजनाबाई यांच्या नावे —वडिलोपार्जित २ एकर जमीनशासनाकडून मिळालेली ६ एकर जमीनअशी एकूण ८ एकर शेती आहे.आरोपी प्रवीण हा आजी अंजनाबाई यांच्याकडे शासनाकडून मिळालेली सहा एकर शेती आणि अर्धी पेन्शन नावावर करून देण्याचा सतत तगादा लावत होता. पण अंजनाबाई यांनी नकार दिल्याने तो त्यांच्याशी वाद घालत आणि जीवे मारण्याची धमकी देत होता.घटनेचा दिवस५ ऑगस्ट रोजी सकाळी फिर्यादी व कुटुंबातील सर्वजण शेतात गेले होते. घरात अंजनाबाई एकट्याच होत्या. दुपारी सुमारास फिर्यादीचा मुलगा घरी आला असता त्याला आजी मृतावस्थेत दिसल्या.नाक व तोंडातून रक्तस्त्रावगळ्यावर व्रणयावरून गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.तक्रारदाराने गावातील लोकांना बोलावून पोलिसांना माहिती दिली.

तपासा दरम्यान….

आरोपी प्रवीणला अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.

पुढील कारवाई

७ ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पीएसआय राजेंद्र कपले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!