बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 90 हजार 383 अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 74.45 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबतचा परिपत्रक 6 ऑगस्ट रोजी जारी केला आहे.
पावसामुळे मोठे नुकसान….
25 व 26 जून रोजी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.जमिनी खरडून गेल्यापिके उध्वस्त झालीफळबागांचे अतोनात नुकसान झालेएकूण 87 हजार 390 हेक्टर जमिनीवर पिकांचे नुकसान झाले असून याचा फटका थेट 90 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बसला.
तुपकरांचा संघर्ष…
नुकसान झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनीप्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केलीशेतकऱ्यांना धीर दिलाजिल्हाधिकाऱ्यांना व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेमुंबईत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेऊन मदतीची मागणी केलीसरकारवर सातत्याने दबाव आणल्याने अखेर ही मदत मंजूर झाली.
शेतकऱ्यांचा विश्वास…
शेतकरी तुपकरांविषयी म्हणतात,“ही मदत आमच्या एकजुटीचा आणि तुपकर यांच्या लढ्याचा परिणाम आहे.”यापूर्वीही जीव घेणे आंदोलने करून तुपकर यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली आहे. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी रस्त्यावर उतरून लढतात, हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.