मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने विळ्याने मारहाण केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी झोडगा गावात घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च सरकार करणार; बालिका समृद्धी योजना आहे तरी काय?
झोडगा येथील रामेश्वर प्रभाकर चव्हाण यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी संदीप शिवसिंग डाबेराव हा त्यांचा शेजारी आणि नातेवाईक असून तो त्यांच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत वाद घालत होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रामेश्वर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदीपने अश्लील शिवीगाळ करत विळ्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि जखमी केले.
या घटनेनंतर मलकापूर शहर पोलिसांनी संदीप डाबेराव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.