खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील फाटकपुरा दर्गाजवळ एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली.
मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च सरकार करणार; बालिका समृद्धी योजना आहे तरी काय?
३२ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, घरासमोर दगडफेक सुरू होती. त्यामुळे आवाजामुळे तिने दरवाजा उघडला. त्याचवेळी आतीफ फैजान शेख रफीक, शेख शाकीब, शेख बब्बू आणि सैय्यद अन्वर या चौघांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून महिलेवर हात उगारत मारहाण केली. यावेळी तिच्या पती, मुलगी आणि शेजाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली.
तसेच, आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.