EXCLUSIVE पालकमंत्री मकरंद आबांना जनतेपेक्षा झोप अधिक प्रिय?भरोसा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाकडे त्यांनी चक्क फिरवली पाठ !

पती-पत्नीने गळफास लावून संपवले जीवन; कर्जबाजारीपणाचा शेतकरी कुटुंबावर दाहक परिणाम…

बुलडाणा (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आंबा पाटील यांना त्यांच्यावर राज्य सरकारने सोपवलेल्या पालकत्वाच्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसतोय. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांची व्यथा ऐकण्या ऐवजी त्यांना झोप आणि पक्ष प्रवेश जास्त महत्त्वाचे वाटल्याने शेतकरी वर्गात शासना प्रती तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केवळ १४ मिनिटांत झटपट पाहणी उरकून घेत “आले तसे निघून गेले” आणि निघून गेले. त्यानंतर मात्र त्यांना एका पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी पुरेसा वेळ मिळाला…..! पण चिखली तालुक्यातील भरोसा येथील आत्महत्याग्रस्त थुट्टे शेतकरी दाम्पत्याच्या कुटुंबाची भेट घ्यावसी वाटली नाही.

त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यां विषयी किती संवेदनशील आहे या बाबद ग्रामीण भागात चर्चा रंगत आहे.विशेष म्हणजे, बारामतीहून आत्महत्या ग्रस्त शेतकरी दाम्पत्याच्या कुटूंबाला खास भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार हे स्वतः भरोसा येऊन थुट्टे कुटुंबाला भेटून सांत्वन करून गेले. पण ज्या जिल्ह्यात ही आत्महत्या झाली ती जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र सकाळी १० वाजेपर्यंत झोप काढत बसले त्यानंतरही त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेणे गरजेचे वाटले नाही किंबहुना सत्ताधारी राज्य सरकारमधील एकही मंत्री येऊन या शेतकरी कटुबाच्या दुःखावर फुकंर घालन्याची तसदी घेतली नाही.

या घटनांमुळे शासना विरोधात तीव्र नाराजी आणि व्यक्त होत आहे. “सत्ताधाऱ्याना शेतकऱ्यांच्या मरणाबाबद काही देणंघेणं नाही तर त्यांना केवळ फक्त त्यांच्या सत्तेचीच चिंता आहे!”मागील महिन्यात याच पालकमंत्र्याच्याच पक्षातील माजी कृषीमंत्री कोकाटे हे वेळोवेळी शेतकऱ्यांबाबद चुकीची विधाने करून शेतकऱ्यांची थट्टा करताना दिसले, त्यामुळे शेतकऱ्यांविषयी या लोकांचा दृष्टिकोन काय आहे, हे स्पष्टपणे एकामागून एक समोर येत आहे. शेतकऱ्यांबद्दल थोडेही प्रेम नसलेल्या माजी कृषीमंत्री आणि पालकमंत्री यांच्या बद्दल बुलढाणा जिल्हाभरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!