दिल्ली (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) —देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बरेली (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असलेल्या फरजाना या महिलेने तिच्या पती मोहम्मद शाहिद याची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी फरजाना हिला अटक केली असून, घटनेमागचं खळबळजनक कारण समोर आलं आहे.खोटं सांगून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्नघटनेनंतर फरजाना पती शाहिदला रुग्णालयात घेऊन गेली. 20 जुलै रोजी सायंकाळी 4.15 वाजता निहाल विहार पोलीस ठाण्यातून रुग्णालयातून फोन आला. एका महिलेने सांगितलं की, तिच्या पतीने स्वतःवर चाकूने हल्ला करत आत्महत्या केली आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टमुळे उघड झालं….
सत्यशाहिदचा मृतदेह पाहिल्यानंतर आणि पोस्टमार्टम अहवालातून पोलिसांना आढळलं की, चाकूचे जखमेचे प्रकार आत्महत्येसारखे नाहीत. ती हत्या असल्याचं स्पष्ट झालं. यावरून पोलिसांनी फरजाना हिला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली.
मोबाईल तपासणी आणि कबुली…
फरजाना हिला रिमांडवर घेऊन पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता काही महत्त्वाचे पुरावे मिळाले. त्यानंतर चौकशीत फरजानाने कबूल केलं की, पती शारीरिक तृप्ती देत नव्हता, म्हणूनच तिने त्याची हत्या केली.
सध्या पोलिसांचा तपास सुरू असून फरजाना पोलीस कोठडीत आहे.ही घटना अनेक प्रश्न निर्माण करणारी असून पती-पत्नीमधील वैयक्तिक वाद विकृत पातळीवर गेल्याचं यातून स्पष्ट होतं. दिल्ली पोलिसांचा तपास सुरू असून, पुढील तपशील उघड होण्याची शक्यता आहे.
1 thought on “STATE NEWS : रात्री शारीरिक संबंधं करताना पतीने पत्नीला खूश केलं नाही; रागाचा भरात पत्नीने पतीला…”