धाड शहरात भीषण आग; पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान…

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शहरातील मुख्य बाजारपेठेत आज सायंकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे नीलम टायर्स नावाच्या दुकानाला भीषण आग लागली. काहीच मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण करून शेजारील चार ते पाच दुकाने आपल्या कवेत घेतली. या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कसे घडले प्रकरण?

सायंकाळी उशिरा, नीलम टायर्समध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि तिथून आगीचा भडका उडाला. हवामान पावसाळी असूनही, आगीची तीव्रता प्रचंड होती. काही क्षणांतच शेजारी असलेली दुकानेही आगीच्या विळख्यात सापडली.पोलीस व नागरिकांची धावपळघटनेची माहिती मिळताच ठाणेदार आशिष चेचेरे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीची तीव्रता इतकी होती की, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.अग्निशमन दलाला उशिरआगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बुलडाणा येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

मात्र वृत्त लिहेपर्यंत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले नव्हते, त्यामुळे आग आणखी पसरून मोठे नुकसान होण्याची भीती आहे.संपूर्ण दुकाने जळून खाकया आगीत नीलम टायर्ससह अन्य दुकाने पूर्णतः जळून खाक झाली असून दुकानांतील सर्व साहित्य भस्मसात झाले आहे. दुकानमालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शहरात खळबळ, मदतीची मागणीया घटनेमुळे धाड शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!