अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या बांधावर आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव; मेहकर – लोणार तालुक्यातील या गावात जाणार…!

मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात २६ जून रोजी लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असून पिकांचेही नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज (२८ जून) प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे.खासदार जाधव यांच्या दौऱ्याची सुरुवात आज सकाळी १० वाजता लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथून झाली. त्यानंतर अंजनी, शारा, वेणी गुंधा या गावांमध्ये त्यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याचे नियोजन आहे.

याच दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, डोणगाव, गोहेगाव, पांगरखेड, जनुना, शेलगाव देशमुख, विश्वी आणि घाटबोरी या गावांना ते भेट देणार आहेत.खासदार जाधव प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीतील हानीचे निरीक्षण करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानभरपाईबाबत माहिती घेतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या बांधावर आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव; मेहकर – लोणार तालुक्यातील या गावात जाणार…!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!