चिखली, (बुलडाणा कव्हरेज न्युज): वळती ग्रामपंचायत, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे आज पवार हॉस्पिटलच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. चिखलीतील बस स्टँड जवळ, दळवी हॉस्पिटल शेजारी, साई नगर येथे मुख्यालय असलेल्या पवार हॉस्पिटलने हा सामाजिक उपक्रम राबवला. या शिबिरात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
या शिबिरात पवार हॉस्पिटलचे डॉ. अतुल दामोधर पवार (MBBS, DGO, DNB – OBGY) आणि डॉ. पल्लवी अतुल पवार (MBBS – जनरल फिजिशियन) यांनी महिलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि मार्गदर्शन केले. डॉ. अतुल पवार यांनी प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून (प्रसूती आणि रोगनिदान तज्ज्ञ), तसेच डॉ. पल्लवी पवार यांनी सामान्य वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून आपल्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करत महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निदान केले आणि त्यांना आवश्यक सल्ला दिला. शिबिरात प्रामुख्याने सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी आणि महिलांशी संबंधित विशिष्ट आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
पवार हॉस्पिटलच्या सेवांचा परिचय
पवार हॉस्पिटल, चिखली येथील एक विश्वासार्ह मॅटर्निटी आणि नर्सिंग होम, खालील सेवा प्रदान करते:
- सोनोग्राफी (गरोदर माता तपासणी)
- प्रसूती व प्रसूतीपश्चात तपासणी व उपचार
- वेदनारहित डिलिव्हरी (पेनलेस डिलिव्हरी)
- नॉर्मल आणि सिझेरियन डिलिव्हरी
- गर्भाशयाचे आजार, निदान व उपचार
- दुरबिणीने शस्त्रक्रिया (लॅपरोस्कोपी)
- गर्भपिशवीची गाठ काढणे (मायोमेक्टॉमी)
- तांबी (कॉपर टी) बसवणे व काढणे
- कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया
- एचपीव्ही लस देण्याची सुविधा
- वंधत्व निवारण
- NST (बाळाचे ठोके तपासणी यंत्र)
- स्त्री कर्करोग चाचणी व निवारण
- High Risk Pregnancy व उपचार
विशेष म्हणजे पवार हॉस्पिटल येथे दर सोमवारी फक्त ५० रुपये ओपीडी फी आकारल्या जाते. या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात २४ तास संपर्क साधता येतो. हॉस्पिटलचा हेल्पलाइन क्रमांक ७४९९६७९१३१ हा आहे.
वळती गावातील ग्रामस्थांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी सतीश जाधव आणि स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. गावातील महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पवार हॉस्पिटलच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि अशा शिबिरांचे भविष्यातही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संपर्क आणि माहिती
पवार हॉस्पिटलच्या या सेवा आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी चिखलीतील बस स्टँड जवळ, दळवी हॉस्पिटल शेजारी, साई नगर येथे प्रत्यक्ष भेट देऊ शकता, किंवा अधिक माहिती हवी असल्यास पवार हॉस्पिटलशी थेट संपर्कासाठी त्यांच्या हेल्पलाइन क्रमांक ७४९९६७९१३ वर संपर्क साधता येईल.













