लोणार (दिपक कायंदे – बुलडाणा कव्हरेज न्यूज) – लोणार तालुक्यातील येवती गावात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) व ग्रामस्थांनी एल्गार मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी केले.गेल्या दोन वर्षांपासून येवती आणि परिसरात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून, काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक महिलांनी नवऱ्यांच्या दारूच्या व्यसनामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.ही दारूविक्री थांबवावी, या मागणीसाठी गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, महिलांसह शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येऊन पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चात सहभागी प्रमुख व्यक्ती:
डॉ. गोपाल बछिरे (शिवसेना जिल्हा संघटक)अॅड. दीपक मापारी (तालुकाप्रमुख)गजानन जाधव (शहरप्रमुख)प्रयाग पाटोळे (येवतीचे सरपंच)रामेश्वर कायंदे (उपसरपंच)गोदावरी कायंदे (तंटामुक्ती अध्यक्ष)तसेच ग्रामपंचायत सदस्य दशरथ शिंदे, ज्योती सरकटे, कुसुम टाकसाळकर, विश्रांती अडागळे, कलीम कुरेशी, मंगेश मोरे, व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी केली असून, लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.